एक भावकवी आणि ‘मृगावर्त’ या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कविवर्य कृ. ब. निकुंब मराठी साहित्यसृष्टीला परिचित आहेत. भावंगीर व चिंतनशील मनोवृत्तीचे कवी कृष्ण बळवंत निकुंब यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. ‘घाल घाल पिंगा वार्याा माझ्या परसात…’ असे हळूवारपणे लिहिणारे निकुंब जितके कवी म्हणून थोर होते तितकेच एक शिक्षक म्हणूनही फार मोठे होते.
कृ. ब. निकुंब कॉलेजमध्ये ‘साहित्यातील परंपरा आणि संप्रदाय’ हा विषय समरसून शिकवायचे. शिकविण्याच्या ओघात कितीतरी कवींच्या कविता सहज म्हणायचे. प्रत्येक वर्गाला काहीतरी नवीन देण्याचा निकुंब प्रयत्न करायचे. त्यांच्या व्याख्यानातून विद्वतेचा फार मोठा ओघ विद्यार्थ्यांच्या काळजापर्यंत पोहोचायचा. कितीतरी कविता, ज्ञानेश्व्री सरांना पाठ होती.
“उज्वला” या काव्यसंग्रहामुळे कवी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. “ऊर्मिला”, “अनुबंध”, “अभ्र”, “पंख-पल्लवी” आदी काव्यसंग्रह तसेच “सायसाखर” हा बालगीतसंग्रह आणि “मृगावर्त” हे खंडकाव्यही त्यांनी लिहिले. “पारख” हा त्यांचा जुन्या-नव्या कवितांचे समीक्षण करणारा लेखसंग्रह असून १८७० ते १९२० या काळातील कवितेचा इतिहासही त्यांनी लिहिला होता.
कृ. ब. निकुंब यांचे मराठीसृष्टीवरील विविध लेख.
Leave a Reply