आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर.
२० जानेवारी १८९८ ला यांचा जन्म झाला. शास्त्रीय संगीताचाही त्यांचा सखोल अभ्यास होता. हिदुस्थानी शास्त्रीय संगीताची त्यांनी जवळ जवळ पन्नास वर्षे तपश्चर्या केली. अभंग आणि भजने ही त्यांच्या गाण्याच्या मैफलींची खासियत होती. त्यांची ‘परब्रह्म निष्काम तो हा’, ‘जो पिया तोडू’, ‘देव म्हणे नाम्या पाहे’ इत्यादी अनेक भजने गाजली आहेत. शारदा, संशय कल्लोळ, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘सौभद्र’ इ. नाटकांतून त्यांनी भूमिकाही केल्या. बालगंर्धवांनी गायलेल्या कान्होपात्रा, नंदकुमार, अमृतसिद्धी इत्यादी नाटकांतील पदांना चाली लावल्या होत्या. ‘मनरमणा मधुसूदना,’ ‘क्षण आला भाग्याचा’ इत्यादी अनेक पदे गाजली. अनेक हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. ‘माली’, ‘भत्त*ीचा मळा’ इत्यादी सिनेमात भूमिकाही केल्या. आपल्या ‘राग संग्रह’ या पुस्तकात रागदारीच्या चिजा लिहून पुढील पिढ्यांसाठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर (20-Oct-2016)
मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर (20-Jan-2017)
मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर (20-Jan-2018)
Leave a Reply