उत्तम व नैसर्गिक अभिनय क्षमता, निःपक्षपाती समिक्षा, कथा, व समाजकल्याण अशा विविध गुणांचा प्रभावी मिलाफ असणारे व आयुष्यभर अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये सारख्याच तन्मयतेने वावरणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लाडकोजीराव आयरे ! खेडयातील संस्कृती, रीतिरिवाज, रूढींशी त्यांचं जीवन निगडित असल्यामुळे, खेडयातील पार्श्वभूमी त्यांनी आपल्या नाटकांमधून अत्यंत कल्पकतेने उभी केली. समाजाच्या दृष्टीने ज्वलंत व खळबळजनक विषयावर त्यांनी १८ नाटके लिहून कित्येक सामाजिक समस्यांना व अन्यायाला वाचा फोडली.
महाराष्ट्र राज्य सरकारचा साहित्य लेखन स्पर्धेत उत्कृष्ट नाटयलेखनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, तसेच अखिल भारतीय नाटय परिषदेने श्रमजीवी वर्गाचे रंगभूमीवरील पहिले यशस्वी नाटककार म्हणून त्यांचा गौरव केला गेला होता .
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Leave a Reply