लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी हे मराठी लेखक, कोशकार, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.
त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले.त्यांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व राज्य ग्रंथ पुरस्कारांची सुरूवात केली. त्यांना १९५५ साली ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ साठी पहिला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवाय त्यांना १९७३ साली राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्काराने तर १९७६साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
१९५४ साली दिल्ली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६० ते १९८० दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. ते महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ पहिले अध्यक्ष होते.मराठी विश्वकोशाचे ते आद्य संपादक आहेत.प्रा. रा.ग. जाधवांनी ‘शास्त्रीजी’ हा तर्कतीर्थांच्या कार्याचा परिचय देणारा ग्रंथ लिहिला आहे. त्यांचा मृत्यू २७ मे १९९४ रोजी झाला.
त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य
वैदिक संस्कृतीचा विकास
मराठी विश्वकोश (संपादन)
धर्मकोश (एकूण १६ खंडांचे संपादन)
विचार शिल्प
आधुनिक मराठी साहित्य
समीक्षा आणि रस सिद्धांत
हिंदू धर्मसमीक्षा
श्रीदासबोध
राजवाडे लेख संग्रह (संपादन)
उपनिषदांचे भाषांतर
संस्कृत संहितेचे वर्गीकरण (Catalogue of Sanskrit Scripts)
Leave a Reply