महेश मांजरेकर

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ रोजी मुंबई येथे झाला.

महेश मांजरेकर यांनी आपल्या करीयर सुरुवात १९८४ साली ‘अफलातून’ ह्या मराठी नाटकामधून केली. दिग्दर्शक म्हणुन त्यांनी १९९५ साली ’आई’ या मराठी चित्रपटापासून सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम दिग्दर्शकचे फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. १९९९ साली त्यांनी ’वास्तव’ चित्रपटाचे दिग्दर्शक केले. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वोत्तम चित्रपट ठरला.

२००१ साली एहसास या चित्रपटापासुन त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. २००२ साली ’कांटे’ चित्रपटातील त्यांची भुमिका गाजली. पुढे त्यांनी प्राण जाये पर शान न जाये, रन, मुसाफिर, पदमश्री लालू प्रसाद यादव, जवानी-दिवानी, दस कहानिंया, स्लमडॉग मिलेनियम, वाँटेड, दबंगसारख्या अश्या चित्रपटात विविध भुमिका सकारुन आपल्या अभिनयाची चुणुक दाखविली.

त्यांनी लेखन व भुमिका केलेला ’मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा मराठी चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर त्यांनी ”शिक्षणाच्या आईचा घो”, ”लालबाग परळ”, ”फक्त लढ म्हणा”, ”काकस्पर्श” आणि ”कोकणस्थ” या चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याची महत्वाची कामगिरी केली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*