सन २००३ (पॅरीस) व सन २००५ रोजी (चायना) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं सहभाग घेतला. सन २००५ रोजी तिने पाकिस्तान येथील दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले.
सन २००९ रोजी बांग्लादेश येथील दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक. सन २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा (न्यू दिल्ली)येथे रौप्य पदक. सन २०११ मध्ये कोलकत्ता येथे राष्ट्रीय स्पर्धेत महिला गटांमध्ये कास्य पदक, महिला दुहेरी गटात रौप्य पदक, महिला एकेरी गटात कास्य पदक, २०११ साली रांची येथे झालेल्या नॅशनल गेम महिला गटात सुवर्ण पदक, महिला दुहेरी गटात रौप्य पदक, महिला एकेरी गटात कास्य पदक संपादन केले.
“स्टेट चॅम्पियनशिप” सलग ६ वर्षे प्राप्त करण्याचा उच्चांक ममता प्रभू हिच्या नावावर अबाधित आहे.
तिच्या कामगिरीबद्दल तिला :
१९९८ मध्ये – मालवण गट परिषदेतर्फे सन्मान
२००३ मध्ये – मॅरेथॉन पुरस्कार
२००४ मध्ये – शिवसेना क्रीडा महोत्सव
२००५ मध्ये – शिवछत्रपती पुस्कार
२००६ मध्ये – जागतिक महिला दिनानिमित्त “यशस्वी महिला” म्हणून सन्मान
२००६ मध्ये – ठाणे महानगरपालिका गौरव पुरस्कार
२००६ मध्ये – “रोट्रॅक्ट क्लब” ठाणे येथे सन्मान
२००८ मध्ये – “सरस्वती मंदिर ट्रस्ट” गौरव पुरस्कार
यांनी गौरविण्यात आले.
Leave a Reply