मंदार फणसे हे राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या नैसर्गिक शैलीमुळे व बहारदार व्यक्तिमत्वामुळे प्रसिध्द पावलेले एक अनुभवी व तरूण पत्रकार असुन सध्या ते आय.बी.एन लोकमत या वृत्तवाहिनीचे संपादक आहेत. हिंदी व मराठी वृत्त देणारे डेस्कवरचे पत्रकार व प्रादेशिक जबाबदार्यांची सुत्रे सांभाळण्याची सुत्रे त्यांच्या अखत्या पत्रकारिता या क्षेत्रातील त्यांचा अनुभव दांडगा असून शिक्षण क्षेत्रातले त्यांचे विशेष कौशल्य, व संशोधक तसेच चौकस वृत्ती सर्वज्ञात आहे. राष्ट्रीय स्तरावरील छपाईच्या व ऑडियो व व्हिडीयो प्रसारमाध्यांच्या सहवासात दीर्घकाळ राहिल्यामुळे त्यांच्यामधील पत्रकार अधिकच अभेद्य झाला आहे.
मंदार फणसेनी अॅनथ्रोपोलॉजी या विषयामध्ये खास प्राविण्य मिळविले असून ही अमुल्य मिळकत त्याच्या पत्रकारितेमधील स्वप्नवत कारकिर्दीचा उल्हास द्विगुणित करून जाणारी आहे. मंदार यांचे शालेय शिक्षण के. व्ही. हायस्कुल जव्हार येथे झाले. १९९९ साला पासून मुद्रीत माध्यमासोबतच त्यांनी एन.डी.टी.व्ही., सी.एन.एन., व आय.बी.एन. अशा प्रतिष्ठीत वाहिन्यांतर्फे काम करून पत्रकारितेच्या विविध निर्जन वाटा व कौशल्ये त्यांनी पिंजुन काढली.
मंदार फणसेंनी याआधी सुध्दा म्हणजे २००८ साला पासून आय.बी.एन वृत्तवाहिनीवर सहसंपादक व वृत्तनिवेदक म्हणून काम केले असून २०११ नंतर त्यांनी “भारत-फॉर-इंडिया” या वृत्तसंकेतस्थळाचे मुख्य संपादक म्हणुन काम केले आहे. त्यानंतर काही काळ साम मराठी या वाहिनीवर वृत्त विभागात संपादक म्हणून काम केले आहे.
देशातल्या विवीध भागांमध्ये कार्यशाळा व चर्चासत्र घेवून या देशातील तरूणाई मध्ये दर्जेदार पत्रकारितेची बीजे पेरणे हा उद्योगदेखील जोमाने सुरु असतो. वेगवेगळ्या शाळांमध्ये व कॉलेजांमध्ये सुध्दा लेक्चरर म्हणून त्यांना पाचारण करून त्यांचा मौलिक मार्गदर्शनाचा लाभ होतकरू विद्यार्थ्यांना दिला जातो. ते जसे एक जबाबदार पत्रकार व बुध्दिमान आभ्यासु आहेत, तसेच त्यांच्या कारकिर्दीला, सह्काराच्या साहाय्याने समाजसेवा करण्याची अनोखी किनार देखील लाभलेली आहे. शेतीची त्यांना प्रचंड आवड आहे. स्वःताचे फार्महाऊस विकसीत करून नुकताच स्थानिक दुधउत्पादकांना जमवून त्यांची संघटना काढण्याचा प्रकल्प, कामाच्या व्यापाची कसरत सांभाळून त्यांनी राबविला. पोहणे व खो खो हे त्यांचे जिव्हाळ्याचे क्रीडाप्रकार आहेत.
२००६ मध्ये गोवा कोंकणी अॅकेडमी ने त्यांना एका कार्यशाळेसाठी तेथील विवीध प्रदेशांमधून जमलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणीक मार्गदर्शन करण्यासाठी मेन्झा एस ब्रेगेझा च्या नामांकित आर्ट गॅलेरीमध्ये आमंत्रित केले होते.
Leave a Reply