मंगला बर्वे या जेष्ठ लेखक स. आ. जोगळेकर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध साहित्यिक अच्युत बर्वे यांच्या पत्नी. माहेरची माणसे चवीची चोखंदळ, तशीच सासरचीही. त्यामुळे नित्य नवनव्या पाककृती आत्मसात होत गेल्या. थोडे वैविध्य हवे, म्हणून केटरिंग कॉलेजचे शॉर्ट कोर्सेसही त्यांनी केले.
अन्नपूर्णा या पुस्तकावर कित्येक महिला आणि परदेशात जाणारी, एकटी राहणारी तरुणाई स्वयंपाक करायला शिकली. त्यांच्या या पुस्तकाने विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडले. सध्या या पुस्तकाची ७७ वी आवृत्ती बाजारात आहे.
अन्नपूर्णा या पुस्तकाबरोबरच त्यांची मांसाहारी इच्छाभोजन, चायनीज पदार्थ, डोहाळे-बारसे, रुखवताचे पदार्थ, छंद लोकरीच्या विणकामाचा, लोकरीने विणून केलेली खेळणी अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
मंगला बर्वे यांचे २३ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झाले.
Leave a Reply