![103181](https://www.marathisrushti.com/profiles/wp-content/uploads/sites/2/2014/11/103181.jpeg)
मुंबई महापालिकेत नगरसेवक ते महापौर…… पुढे विरोधी पक्षनेता ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री….नंतर खासदार, केंद्रिय मंत्री आणि उल्लेखनीय म्हणजे लोकसभा अध्यक्ष.
यशाची अशी सतत चढती कमान असलेले मनोहर जोशी हे एक कल्पक नेतृ़त्व. आपल्या चार वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्द त्यांनी अनेक अभिनव योजना यशस्वपणे राबविल्या. मुंबईतील उड्डाणपूल, दळणवळण क्षेत्रात क्रांती घडून आली. द्रुतगती महामार्ग व उड्डाणपुलांसाठी ३ हजार ७०० कोटी रुपयांचा निधी त्यांनी उभारला. झोपडपट्टीवगासियांना मोफत घरे, एक रुपयात झुणका भाकर अशा अभिनव योजना त्यांनी राबविल्या, महाराष्ट्र टॅंकरमुक्त करण्याचा प्रयत्न केला.
गावोगावी स्वच्छतागृहांची निर्मिती केली. नवीन शैक्षणिक धोरण, क्रीडाप्रबोधिनीची स्थापना, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, मातोश्री वृद्धाश्रम योजना, महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना इ. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मनोहर जोशी यांनी आपल् कारकिर्दीचा ठसा जनमानसांवर उमटविला आहे.
Leave a Reply