मनोज जोशी

अभिनेते मनोज जोशी यांचा जन्म १४ डिसेंबर १९६५ रोजी गुजरात मधील हिम्मत नगर येथे झाला.

मनोज जोशी यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तरी कॉमेडी भूमिका त्यांच्या जास्त वाट्याला आल्या आहेत. मूळ गुजराथी असलेल्या मनोज जोशी यांचे शिक्षण मराठीत झाले. त्यांचे वडील नारदीय कीर्तनकार होते.

मनोज जोशी यांनी ‘चाणक्य’ हे नाटक लिहायला १९८६ पासून केली. चार वर्षे संशोधन, लेखन, भूमिकांची निवड वगैरे करून हे नाटक रंगभूमीवर आले. चाणक्याची मुख्य भूमिका मनोज जोशींनी केली आहे. ‘चाणक्य’ नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर मनोज जोशीनी अनेक मराठी, गुजराथी, हिंदी, भोजपुरी आणि इंग्रजी नाटकांमधून भूमिका केल्या. पुढे मनोज जोशी यांनी विजय तेंडुलकर यांचे ’घाशीराम कोतवाल’ हे नाटक गुजराथीत अनुवादित केले.

२०१७ रोजी आलेल्या ‘दशक्रिया’ या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली आहे. १९९८ पासून त्यांनी ७५ हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, त्यांतल्या बऱ्याचशा भूमिका विनोदी आहेत. चरित्र भूमिका ही मनोज जोशी यांची खास पसंती आहे.

मनोज जोशी यांनी सर्फरोश या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सरफरोश, चांदनी बार, हंगामा, देवदास, हलचल, पेज 3, फिर हेरा फेरी से, चुप चुप के, गरम मसाला, गोलमाल, भागम भाग, भूलभुलैया, मेरे बाप पहले आप, बिल्लू, दे दना दन खट्टा-मीठा हे त्यांचे काही हिंदी चित्रपट होत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भूमिका मनोज जोशी यांनी साकारली आहे. काही वर्षापूर्वी मेंदुला स्ट्रोक आल्यामुळे ते दीड महिने लीलावती हॉस्पिटलमध्ये होते. नंतर वर्षभर बेडवर राहिले व त्यातून पुन्हा उभा राहिले. नंतर मग मागे वळून बघितले नाही.

२०१८ भारत सरकारने मनोज जोशी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*