मारुतीराव कीर यांनी आपले करियर तबला वादक म्हणून सुरू केले. त्यांचे गुरु होते भानुदास मानकामे, भैरव प्रसाद, सुंदर प्रसाद आणि उस्ताद गेमखान साहब होते. मारुती राव कीर यांनी शंकर जयकिशन यांच्या व्यतिरिक्त जवळजवळ सर्व संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर काम केले. जवळजवळ सर्व जुन्या मराठी चित्रपटांमधून आणि नॉन-फिल्मच्या गाण्यांमध्ये मारुती राव कीर यांनी तबला वाजवला आहे.
मारुती राव कीर यांनी आधी एस.डी बर्मन यांच्या साठी आणि नंतर आर.डी बर्मन यांच्या साठी शेवटपर्यत रिदम असिस्टट म्हणून काम केले.
तबलावरील त्यांची निपुणता “पिया तोसे नैना लेगे रे” या गाण्यात दिसते. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या काळात मारुतीराव आणि पंचम यांची मैत्री झाली व ती शेवट पर्यत टिकली. पंचमच्या यांच्या पहिल्या चित्रपट “छोटे नवाब” पासून मारुतीराव कीर रिदम ऍरेंजर व जवळचा मित्र म्हणूनच राहिले. पंचम यांचे इतर सर्व संगीत दिग्दर्शकांमध्ये सर्वात जास्त फॅन आहेत.
मारुतीराव कीर हे एवढे मोठी व्यक्ती असून शेवट पर्यत साधे राहिले. दादरमधील आपल्या १० × १२ च्या रूम मध्ये ते राहत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचा पहिला विद्यार्थी अमृतराव काटकर होते. मारुतीराव कीर यांच्या मुळे पंचम यांचे बहुसंख्य तालवादक अण्णा जोशी, अमृतराव, मान्या बर्वे, नाईक,असे मराठी माणसेच होती.
मारुतीराव कीर व पंचम यांची एवढी मैत्री होती की पंचम यांच्या निधना नंतर त्यांनी रेकॉर्डिंग बंद केले होते. मारुतीराव कीर यांचे निधन ११ जानेवारी २००५ रोजी झाले.
Leave a Reply