शिर्के, मयुरेश

शिर्के, मयुरेश

मयुरेश शिर्के हे नाव माध्यम क्षेत्राशी विशेषत: “श्राव्याशी” जोडलं गेलं असून, रेडिओ, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील व्हि.ओ. (व्हॉईस ओव्हर) तसंच डबिंग शी निगडीत आहे. मुंबई आकाशवाणी केंद्रावर मयुरेश शिर्के यांनी हंगामी निवेदक व आर.जे. (रेडिओ जॉकी) म्हणून काम केलेलं आहे. बालपण, शालेय तसंच महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतलंच; “खनक अॅडव्हर्टायझिंग” ही स्वत:ची जाहिरात कंपनी असून विविध जाहिराती, चित्रपटांचे प्रोमोज, कार्टुन्ससाठी आवाज, प्रायोजित कार्यक्रमांची निर्मिती ही त्यांच्या कंपनीतर्फे करण्यात येते. त्याबरोबरच मयुरेश शिर्के स्वत: आवाजाचं प्रशिक्षण व शास्त्रोक्त शिक्षण, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना व्याख्यानांमधून देत असतात. “मन:स्पर्शी” या पुस्तकामधून, मयुरेश शिर्केंच्या आर.जे, व्हि.ओ. आर्टीस्ट व माध्यमातील अत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचा अनुभव कथित करण्यात आला आहे.

( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*