जन्मः १-डिसेंबर-१९५४
मेधा पाटकर या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आहेत. मुंबई येथे जन्मलेल्या मेधा पाटकर यांचे पालक सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक होते. त्यांच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता. आई स्वादर नावाच्या स्त्रियांच्या प्रश्नाला वाहिलेल्या संस्थेची कार्यकर्ती होती. त्यांच्या पालकांच्या विचारांचा मेधा पाटकर यांच्या जडणघडणीवर खोल परिणाम झाला. त्यांनी टाटा सामाजिक शास्त्र संस्थेतून एम.ए. पदवी मिळवली.(TISS). त्यानंतर सात वर्षे मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांमधून काम केले. त्यांनी काही काळ टाटा सामाजिक शास्त्र संस्थेत शिक्षकाचे कामही केले. सिंगूर नंदीग्रामच्या सेझ प्रश्नावर (नॅनो प्रकल्प) त्यांनी आंदोलन केले होते.. राज ठाकरे यांनी पुकारलेल्या भय्याविरोधी आंदोलनाला त्यांनी विरोध नोंदवला होता. पुरस्कार राइट लाइव्ह्लिहुड अवॉर्ड, स्वीडन – १९९१. (पर्यायी नोबल पारितोषिक) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी बाबा आमटे यांच्या सोबत संयुक्तपणे) दीनानाथ मंगेशकर पुरस्कार महात्मा फुले पुरस्कार मानवी हक्क रक्षक पुरस्कार – ऍम्नेस्टी इंटरनॅशनल
Leave a Reply