लहानपणापासूनच कबड्डीची आवड असणार्या सौ. मिनल संजय पालांडे यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच कबड्डीसाठी झोकून दिलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला कबड्डी संघात त्यांनी सहा वर्षं महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं आणि एक वर्ष कर्णधार म्हणूनही त्यांनी संघाचं नेतृत्व केलं. त्यांच्या या प्रवासात गेली तीन वर्षं त्या ठाणे जिल्हा महिला कबड्डी असोशिएशनच्या त्या सन्माननीय सदस्य देखील आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या त्या ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या “प्रभारी क्रीडा अधिकारी” म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या या प्रवासात त्यांना १९९३-९४ सालचा महाराष्ट्र राज्याचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.
Leave a Reply