![10892](https://www.marathisrushti.com/profiles/wp-content/uploads/sites/2/2014/11/10892.jpeg)
ठाण्यातील पत्रकार परंपरेतील आणखी एक नाव म्हणजे तीस वर्षं पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणारे मिलिंद बल्लाळ हे होय. १८ वर्षं टाईम्स ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असणारे मिलिंद बल्लाळ सध्या “ठाणे वैभव” या वृत्तपत्राचे संपादक आहेत. अमराठी ठाणेकरांना आपल्या ठाण्याविषयीच्याघडामोडी समजाव्यात म्हणून त्यांनी Know Your Town हे साप्ताहिक सुरु केलं.
मिलिंद बल्लाळ हे पत्रकारिते व्यतिरिक्त समाजकार्य, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ही कार्यरत आहेत. प्रवासी महासंघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. रोटरी क्लब, तसेच विधायक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग असतो.
आजवरच्या कारकीर्दीत त्यांना “बाळशास्त्री जांभेकर” पुरस्कार, रावसाहेब गोगटे पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
Leave a Reply