रिदमिक जिमनॅस्टिक या खेळात सहसा कुणी रस घेत नाहीत. परंतु ठाण्यातील मुग्धा केतकर हिने मात्र शालेय जीवनातच आपला मार्ग निश्चित केला आणि वयाच्या ९ व्या वर्षापासून राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत पदक मिळवायला सुरुवात केली.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. त्याच उक्तीला अनुसरुन मुग्धानं २००६ साली राज्य स्पर्धेत पदक मिळवलं. तसंच २००७ पासून तिची झेप राष्ट्रीय स्तरावर पोहोचली व तिथेही तिनं पदक मिळवलं. २००८ मध्ये चिल्ड्रन एशिया इंटरनॅशनल स्पोर्टस् गेम्स (रशिया) या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करुन तिनं ठाण्याचं नाव आशिया स्तरावर उंचावलं. एवढंच नव्हे तर अभ्यासतही तिने ५ वीत गणित प्रज्ञा परीक्षेत सुवर्णपदक, ६ वीत डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत रजत पदक, ७ वीत शिष्यवृत्ती मिळवून तिनं आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
Leave a Reply