नलिनी जयवंत यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला.
”राधिका” या १९४१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून आपल्या कारकीर्दिला सुरुवात करणाऱ्या नलिनी यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत काही वर्षांतच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. कसदार अभिनयामुळे त्यांना अशोक कुमार, देवानंद आणि दिलीपकुमारसारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करता आले. दिलीपकुमार, नर्गीस यांच्यासोबत “अनोखा प्यार’मध्ये त्यांनी केलेल्या अभिनयाने चित्रपट रसिकांची वाहवा मिळविली होती.
१९६५ सालचा ‘बॉम्बे रेस’ हा प्रमुख भूमिका असलेला त्यांचा अखेरचा चित्रपट. मा.अशोककुमार यांच्या सोबत केलेले “समाधी’, “सरगम”, “मिस्टर एक्सु’, “काफिला’, “मुकद्दर’ हे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. देवानंदसोबत केलेल्या “कालापानी’ या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. “कालापानी’ या चित्रपटासाठी फिल्मफेअरच्या उत्कृष्ट सहअभिनेत्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
नलिनी जयवंत यांचे निधन २० डिसेंबर २०१० रोजी झाले.
Leave a Reply