![p-1504-Mahanor-Namdev-Dhondo](https://www.marathisrushti.com/profiles/wp-content/uploads/sites/2/2010/12/p-1504-Mahanor-Namdev-Dhondo.jpg)
ना. धों. महानोर हे सुपरिचीत ग्रामीण कादंबरीकार व कथाकार आहेत. त्यांनी १९७३ मध्ये लिहिलेल्या ‘गांधारी’ या कादंबरीने ग्रामीण जीवनाची स्पंदने अचूक टिपली होती. साधारणतः १९६० नंतरच्या काळात एकूण भारतीय जीवनात अनेकविध स्वरूपाचे झालेले बदल, महानगरांचा झपाटयाने झालेला विकास, पारंपारिक ग्रामव्यवस्था व ग्रामीण जीवनात सुरू झालेली पडझड, यंत्रयुगाचा प्रभाव, शहरी स्थित्यंतरे या सर्व घटकांचा डोळसपणे व आभ्यासपूर्ण वेध या त्यांच्या कादंबरीने विस्तृतपणे टिपला. निजामी राजवट संपुष्टात आल्यानंतरच्या एका खेडयाची कथा ही मध्यवर्ती संकल्पना डोळ्यांशी ठेवून या कादंबरीचे झालेले लेखन सर्वसामान्य रसिकांच्या मनाला विशेष भावले. या प्रसिध्द कादंबरीशिवाय इतरही अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
Leave a Reply