जन्मः फेब्रुवारी १५, इ. स. १९४९ पुणे जिल्हा
मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते आहेत. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले आहे
दलितांचे,शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार नाटककार् आहे. नामदेव ढसाळांचे बालपण मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये ।गोलपीठा भागात अत्यंत ्गरिबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. अमेरिकन ब्लॅक पँथर चळवळीच्या धरतीवर त्यांनी दलित पँथर ही सशस्त्र संघटना १९७२ मध्ये सुरू केली.
१९७३ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. यानंतर आणखी कवि्तासंग्रह मूर्ख म्हातार्याने डोंगर हलवले(माओईस्ट विचारांवर आधारित), तुझी इयत्ता कंची?, खेळ (शृंगारीक), आणि प्रियदर्शीनी (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा) प्रसिद्ध झाले.
साठोत्तरी मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली कवी. आपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणार्या आणि भाषिक दृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरून मराठीला समृद्ध करणार्या मोजक्या साहित्यिकांपैकी एक. आंबेडकरी चळवळीशी विशेषत: दलित चळवळीशी बांधिलकी. लिखाणावर लघुनियतकालिके, मनोहर ओक, त्याचबरोबर काही प्रमाणात दिलीप चित्र्यांचा प्रभाव दिसतो.
नामदेव ढसाळ यांना ” महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार “, ” सोविएट लँड नेहरू ऍवॉर्ड “, भारत सरकारचा ” पद्मश्री पुरस्कार ” तसंच “साहित्य अकादमीचा गोल्डन लाईफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड ” हा पुरस्कार प्राप्त करणारे ढसाळ देशातले एकमेव कवी आहेत.
नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे १५ जानेवारी २०१४ या दिवशी दिर्घ आजाराने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना निधन झाले.
Leave a Reply