जाईल, नारायण जनार्दन

जाईल, नारायण जनार्दन

स्थापत्यशास्त्रातील पदवी, कोयना प्रकल्प, अवजड अभियांत्रिकी प्रकल्प (रांची), उद्योग मंत्रालय (नवी दिल्ली) असे अभियांत्रिकी क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले नारायण जनार्दन जाईल यांना ठाणं ओळखतं ते त्यांच्या लेखनामुळे.

आजवर ६० हून अधिक कथा-कादंबर्‍या लिहीणारे नारायण जनार्दन जाईल यांनी आपल्या कार्याची सुरुवात अभियांत्रिकी क्षेत्रातून केली. खर्‍या अर्थानी ठाणे घडविण्यात त्यांचा हातभार लागला असे म्हटले तर वावगे ठरणार नागी कारण “ठाणे शहर विकास आराखडा” यावर सूचना व हरकतींचा विचार करण्यासाठी गठीत केलेल्या समितीवर महाराष्ट्र शासनाने त्यांची नेमणूक केली होती.

मनातील ठाणे :

ठाण्याविषयी बोलताना ते म्हणतात, ठाणे शहर झपाट्यानं वाढत आहे. ठाण्यातील पायाभूत सुविधांमध्ये काही उणीवा आहेत. त्यासाठी तंत्रशुद्ध व शिस्तबद्ध नियोजन अनिवार्य आहे. परंतु भविष्यातील प्रकल्पांमध्ये याविषयी विचार होत आहे ही सत्य बाब आहे. नगरसेवक, नागरिक, लोकसेवा अधिकारी आणि तंत्रज्ञ यांच्या एकत्रित सहभागातून उद्याचं ठाणं हे एक सुनियोजित, सुसंस्कारित आणि देखणं शहर होईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*