![10628](https://www.marathisrushti.com/profiles/wp-content/uploads/sites/2/2014/11/10628.jpeg)
नरेंद्र श्रवणजी लोहबरे यांचा जन्म 16 एप्रिल, 1976 रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामध्ये झाला.
व्यवसायाने शिक्षक असलेल्या नरेंद्रजी यांना देश विदेशांतील पुरातन तसेच अर्वाचीन काळामधली नाणी जमविण्याचा फार मोठा छंद आहे व आज त्यांच्याकडे जवळजवळ प्रत्येक परिचित देशामधील चलन व त्या देशांमधली दुर्मिळ
मानल्या जाणारी नाणी उपलब्ध आहेत. हा त्यांचा कित्येक वर्षांपासुन जीवापाड जतन केला गेलेला संग्रह पाहण्यासाठी कित्येक परिचीतांची व अश्या संग्रहांविषयी मनात कुतुहल बाळगणार्या रसिकांची कायम रीघ लागलेली असते.
त्यांना वन्य-प्राणी जीवन तसेच निसर्ग छायाचित्रणाचाही छंद आहे. त्याच्याकडील छायाचित्र संग्रहात जुनी देवस्थाने, विविध फुले यांचाही समावेश आहे.
नरेंद्र लोहबरे हे मराठीसृष्टी पोर्टलवर नियमितपणे लेखन करत असतात.
Leave a Reply