नवनाथ काशिनाथ वहाळ हे शिक्षक, समाजसेवक, विचारवंत व महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले गाढे अभ्यासक अशा विविध भुमिकांमध्ये सारख्याच तन्मयतेने व तज्ञपणे वावरणारे, एक चार चौघांपेक्षा वेगळे वाटणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा जन्म १ जून १९७५ रोजी झाला. ते अहमदनगर येथे वास्तव्यास असतात.
इतिहास हा अगदी लहानपणापासुन त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता व या इतिहासाला गौरवशाली पराक्रमांची व अंगावर रोमांच उभे करणार्या लढायांची झालर प्राप्त करून देणार्या सुभेदार मल्हारराव, अहिल्याबाई व वीरभैरवी होळकर आदी सेनानिंशी त्यांच्या मनाच्या तारा केव्हाच जोडल्या गेल्या होत्या. या व अशा अनेक अजरामर मावळ्यांवर, त्यांनी अतिरंजीत गोष्टींपेक्षा सारासार विचार करणारा व विज्ञानाची कास धरणारा आभ्यासक, या भुमिकेतून विपुल वाचन, मनन व लेखन केले आहे. विचारशील प्रवृत्ती व प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाणारी संशोधक लेखणी ही त्यांना अगदी पुर्वीपासून मिळालेली देणं आहे.
व्यवसायाने शिक्षक असलेल्या वहाळांचे योगदान, त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये इतिहासवादी दृष्टीकोन रूजविण्यापर्यंतच थांबत नाही, तर इतिहासापासुन आपण आज वर्तमानात जगताना आपण कोणता बोध व कोणती काळजी घेवू शकतो, हेदेखील विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवतात. हे करण्यासाठी त्यांच्यासारखा तज्ज्ञ व हाडाचा जाणकारच हवा.
१६९३ ते १८५७ ह्या अत्यंत प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाचा चालता बोलता माहितीकोश ही ओळख विद्यार्थ्यांमध्ये बनविण्यामागे त्यांची प्रचंड मेहेनत व साधना तसेच इतिहासाबद्दल त्यांना वाटणारे प्रेम व जिव्हाळा या गोष्टी दडलेल्या आहेत. १८५७ च्या उठावामधील क्षण नी क्षण व प्रसंग नी प्रसंग त्यांना पाठ आहे वा याविषयीचे लेखनही त्यांनी भरपूर प्रमाणात केले आहे.
Leave a Reply