नयना आपटे यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी मराठी नाटकातून कामं केली. पाचव्या वर्षी ‘पुण्यप्रभाव’ या नाटकात युवराजचं काम केलं. वयाच्या सातव्या वर्षांपासून सलग पाच वर्षं रोहिणी भाटे यांच्याकडे नयना कथकही शिकत असे. त्याच सुमारास सरस्वती बोडसांच्या ‘झाशीची राणी’ या चित्रपटात झाशीच्या राणीचा छोटा मुलगा दामोदर याचं काम तिने केलं.
१९५८ साली ‘रणजित स्टुडिओ’चे मालक नानूभाई मिस्त्री यांच्या ‘चंडीपूजा’ या हिंदी चित्रपटातली काम केले. निरुपा रॉय यांच्या या पहिल्या चित्रपटात छोट्या निरुपा रॉयचं काम नयना आपटे यांनी केले होते.
२४ फेब्रुवारी १९६४ ला शांता आपट्यांचं दु:खद निधन झालं. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून शांताताईंच्या पाथिर्वाला अग्नी नयनानेच दिला. वय वर्ष होतं फक्त चौदा.
नयना आपटे यांच्यावरील लेख वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा.
# Apte, Nayana
Leave a Reply