चव्हाण, नीलेश

Chavan, Neelesh

नाशिकच्या राजकीय क्षितीजावर ज्या झपाट्याने नीलेश चव्हाण हे नाव उदयास आले तितक्यात वेगाने हा उमदा तरुण जीवनपटावरून अस्तंगत होईल, याची कुणी कल्पनाही केली नसावी.

एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात नीलेश जन्मला असला तरी त्याच्या महात्त्वाकांक्षा असामान्य अशाच होत्या. म्हणूनच निफाड तालुक्यातल्या विंचूरसारख्या ग्रामीण भागात शालेय शिक्षण झाल्यानंतर त्याने थेट नाशिक गाठले. तिथे बस स्टँडवरील एसटीडी बूथमध्ये चार वर्षे नोकरी करता करता एल.एल.बी. ची पदवी मिळवली. शिकून केवळ भाकरीला लागणे, इतकेच लक्ष्य असते तर नीलेश कदाचित वकिलीचा डगला चढवून कोर्टाची पायरी चढला असता. पण, व्यवस्था बदलण्याचा आशावाद घेऊन जगणार्‍या युवकांपैकी तो एक होता. म्हणूनच प्रशासकीय सेवेत जाऊन हे काम कराण्याचा निर्धार त्याने केला आणि एमपीएससी परीक्षेला भिडलाही. त्यातूनच नाशिकला चाणक्य मंडळ सुरू करण्यात त्याने पुढाकार घेतला. तहसिलदारपदाच्या पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुलाखतीपर्यंत तो पोहोचलाही होता. मात्र, त्याचवेळी एमपीएससी परीक्षांमधील गोंधळांमुळे भरती प्रक्रियाच रखडली. तारुण्यसुलभ तडफेतून नीलेशने मग त्या परीक्षांचा नादच सोडला आणि तो थेट बांधकाम व्यवसायात उतरला. सवंगड्यांना सोबत घेऊन या व्यवसायात नीलेशने अंगभूत धाडसीपणाने अल्पावधीत जम बसवला. तोवर त्याच्या कुटुंबवेलीवर दोन मुलांची फुलेही उमलली होती.

अर्थात तेवढ्यातच रमण्याचा नीलेशचा स्वभाव नव्हता. शरद पवारांप्रमाणे सर्वव्यापी राजकारणी व्हायचे स्वप्न त्याने मनी बाळगले होते. काही स्थानिक नेत्यांसाठी त्याने कार्यकर्ता म्हणून काम केलेले असले तरी त्याच्या डोळ्यांपुढे अजुन बराच मोठा पल्ला, व ते पण तेवढ्याच विशाल राजकीय पटलावरती गाठायचा होता. म्हणूनच त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर थोड्याच काळात थेट राहूल गांधींपर्यंत पोहोचण्याची मजल मारली.

२००४ सालच्या लोकसभा निवडणूकीत थेट अमराठी मतदारसंघात जाऊन राहिला.

पण आधीपासूनच शिवसेनेचे आकर्षण असलेला निलेश चार वर्षांपूर्वी या पक्षात दाखल झाला तो थेट उद्धव ठाकरेंचे बोट धरून. नाशिकमध्ये शिवसेनेकडे असलेले चेहेरे फक्त आक्रमकतेपुरतेच मर्यादीत होते. नीलेशमुळे शिवसेनेला मध्यमवगीर्य, बुद्धीजीवी आणि समंजस असा चेहेरा मिळाला. त्याची चुणूक नीलेशने पदार्पणातच दाखवून दिली. विद्यार्थी सेनेचा उत्तर महाराष्ट्र संघटक म्हणून नीलेशने २००८ साली नाशिकला घेतलेले राज्य युवा साहित्य संमेलन चांगलेच यशस्वी ठरले. त्याची ही धडाडी उद्धव ठाकरेंना भावली आणि त्यांनी नीलेशला नाशिकचा महानगरप्रमुख म्हणून नेमले. नीलेशचा हा वेग शिवसेनेतील स्थानिक प्रस्थापितांना मानवला नाही. त्यांनी त्याला उपरा ठरवत एकाकी पाडायला सुरूवात केली. अखेर नीलेशचे पद काढून घेण्यात आले. ते का? या प्रश्नाचे उत्तर कुणालाच देता आले नाही. तरीही नेटाने नीलेशने पक्षात वाटचाल सुरूच ठेवली होती. पक्षाच्या प्रस्थापित रचनेतील कंपूबाजी नांदू देत नाही म्हटल्यावर त्याने आदित्य ठाकरेंच्या सोबत काम करण्याचा पावित्रा घेतला आणि युवा सेनेच्या कोअर टीममध्ये त्याचा समावेश झाला.

संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*