नीळकंठशास्त्री शिवरामशास्त्री गोरे हे वादविवादपटू, मराठीतील महत्वाचे ख्रिस्ती धर्मविवेचक, निबंधकार, संस्कृतचे जाणकार आणि वेद-उपनिषदांचे गाढे अभ्यासक होते.
ख्रिस्ती धर्मविचाराचे खंडन करायला निघालेल्या नीळकंठशास्त्र्यांनी स्वत:च ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याने त्या काळी मोठी खळबळ उडाली होती. ख्रिस्ती धर्म हाच मानवाला तारणारा एकमेव सत्य धर्म आहे, असे प्रतिपादन करणारे त्यांचे पत्रही गाजले. १४ पुस्तके आणि २० हून अधिक पुस्तिका त्यांच्या नावावर आहेत.
२९ ऑक्टोबर १८९५ रोजी त्यांचे निधन झाले.
mss
Leave a Reply