वागळे, निखिल

निखील वागळे हे आय. बी. एन. लोकमत या मराठीमधल्या सर्वात जास्त चालणार्‍या वृत्तवाहिनीचे तेजस्वी व बाणेदार पत्रकार असून राजकारणी लोकांच्या ते फारसे पचनी पडलेले नसले तरी सामान्य जनतेच्या मनात मानाचे स्थान त्यांनी केव्हाच पटकावलेले आहे. आपल्या स्प्ष्टवक्तेपणामुळे ते वादांच्या भोवर्‍यांमध्ये अनेकदा अडकले असले, तरी त्यांची परखड मते सुज्ञ लोकांना स्पर्शुन जाणारी असल्यामुळे, महाराष्ट्रातील लोकप्रिय व सर्वपरिचीत पत्रकारांमध्ये त्यांची गणती केली जाते. या व्यवसायामध्ये 1977 मध्ये उडी घेतल्यानंतर, वागळे यांनी पत्रकारितेच्या विवीध क्षेत्रांमध्ये काम करून त्यांच्यामधील पत्रकाराला रुजवले, फुलवले, अधिक आभ्यासशील व तडफदार बनवले. फ्री लान्स रायटर म्हणून हातात पहिल्यांदा लेखणी धरल्यानंतरची ते आतापर्यंतची त्यांची वाटचाल स्वप्नवत अशीच राहिली आहे. तेव्हा त्यांनी हातात धरलेली लेखणी, आजपर्यंत अव्याहतपणे व बेधडकपणे आपला संदेश व समाजिक तळमळ विवीध स्तरांमधल्या जनतेच्या हृद्यावर उमटवित आहे.

कारकिर्दीच्या अगदी सुरूवातीला ‘दिनक’ नावाच्या मराठी वृत्त साप्ताहिकाच्या संपादकपदी त्यांची निवड झाली. किर्लोस्कर प्रकाशन गटाच्या युथ या साप्ताहिकाचे संपादक मणून काम करीत असताना त्यांच्यातील पत्रकार खर्‍या अर्थाने घडत गेला. त्यानंतर या क्षेत्रातील पुरेसे बाळकडु मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था स्थापन केली. अक्षर प्रकाशनचा यशस्वी व विशाल डोलारा सांभाळता सांभाळता एकीकडे त्यांचे, मुलाखती घेणे, विवीध कार्यक्रमांचे सुत्रसंचालन करणे, राजकारण, समाजकारण व धर्मकारण या त्यांच्या विशेष जिव्हाळ्याच्या विषयांवर जळजळीत लेखन करणे असे बहुआयामी कार्य चालुच होते. महानगर, षटकार, चंदेरी अशी अनेक वृत्तपत्रे, व आकर्षक मासिके त्यांनी सुरू करून, नियमीत वाचनाची आवड तरूणांच्यात रूजवली. पत्रकार म्हणून त्यांचा आलेख बघितला तर अशी दुर्मिळ गोष्ट असेल जी त्यांच्या लेखणीपासून सुटली असेल. विवीध टेलिव्हीजन कार्यक्रमांचे निवेदक म्हणून ते प्रसिध्द आहेत.
दिलखुलास बोलणं व हजरजबाबीपणामुळे त्यांना सर्वोत्कृष्ठ निवेदकाचे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. अनेक राष्ट्रिय व राज्य पातळीवरचे मानाचे पुरस्कार प्राप्त झालेल्या व भारतातले सर्वात तरूण संपादक या बिरूदाने वाखाणले गेलेल्या कलंदराला, संवेदनशील लेखक म्हणूनही पसंतीची पावती मिळाली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*