– चित्रकार
ठाणे स्कुल ऑफ आर्टच्या प्राचार्य, चित्रकार व नृत्यांगना निलिमा भालचंद्र कढे म्हणजे ठाणे शहराला अभिमान असणारे कलाकार व्यक्तिमत्व !
त्यांनी सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टमधून कलाक्षेत्रातील शिक्षण घेतलं. कला, वाणिज्य, विज्ञान, मेडिकल, इंजिनियरिंग, एम.बी.ए. इत्यादी सर्व शिक्षण शाखांची सोय उपलब्ध असलेल्या ठाणे शहरात चित्रकलेचे उच्च शिक्षण घेण्याची मात्र सोय नव्हती. परंतु १९८४ मध्ये “ठाणे आर्ट सोसायटी” ची स्थापना करुन ही उणीवही कढे यांनी भरुन काढली. १९८६ पासून “ठाणे आर्ट सोसायटी” च्या माध्यमातून “ठाणे स्कुल ऑफ आर्ट” या ठाण्यातील एकमेव संस्थेची स्थापना केली. नीलिमा कढे या नृत्य, शिल्प आणि चित्र या कलांमधून “अंतरसंबंध” या विषयांवर सप्रयोग व्याख्याने, कलाभिव्यक्ती व प्रयोगकलांचा दैनिक, व मासिकामधून लेखन, बालभारती तर्फे प्रकाशित “कलाहस्तपुस्तिका” लेखनमंडळात सदस्य अशा स्वरुपात कार्यरत आहेत.
कलाक्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना सूर सिंगार तर्फे “सिंगार मणी” हा किताब देऊन गौरविण्यात आले. या व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
Leave a Reply