साहित्य क्षेत्रातील ठाण्यातलं एक अग्रगण्य नाव म्हणजे निलीमा पालवणकर IM.A.M.Phil (मराठी साहित्य) या विषयातून करुन त्यांनी एक वर् मराठीची प्राध्यापिका म्हणून आचार्य मराठे महाविद्यालयात अध्यापनाचं कार्य केलं. १८ महिने “वृत्तमानस” मध्ये दर पंधरा दिवसांनी एक, कवितेवर आधारित रसग्रहण पद्धतीचे स्तंभलेखनही त्यांनी केलं. लहान मुलांनी वाचनाकडे वळावं म्हणून त्यांनी आजवर अनेक व्याख्यानं दिली. “शब्दरान” हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. तसेच अनेक मासिकं, पुस्तकं, वृत्तपत्रं यांतूनही त्यांनी लेखन केलं आहे. मुंबई आकाशवाणीवर कवितावाचन व्याख्यानं, संहितालेखन असं विविधांगी काम त्यांनी केलं आहे. लहान मुलांना मातृभाषा यावी यासाठीही त्या कार्यरत आहेत. त्या कार्याला डॉ. आनंद नाडकर्णी, अनिल अवचट यांनी कमालीची दाद दिली.
मनातील ठाणे :
ठाण्याबद्दल बोलताना त्या म्हणतात ठाणे ही त्यांची जन्मभूमी आणि कार्यभूमी आहे. त्या म्हणतात आपण ज्या ठिकाणी जन्माला येतो आणि लहानाचे मोठे होतो त्या गावावर आपण नेहमीच प्रेम करतो; तसंच माझं ठाण्यावर नितांत प्रेम आहे. कालचं ठाणे हे अधिक शांत व सुंदर होते. आज तसं म्हणता येत नाही. सगळ्याच बाबतीत प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे उद्याचा ठाण्याचा विचार झोप उडवितो; पण प्रशासन आणि लोकसहभाग यांतून आपण ठाण्याला उज्ज्वल करु शकतो असा त्यांचा ठाम निश्चय आहे.
Leave a Reply