जन्म – १९३१
मृत्यू – १३ जुलै २००९
निळू फुले हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते.
नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला . नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणार्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते . या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणार्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला .
राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातून फुल्यांचा अभिनय अंकुरला. यानंतर ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘पुढारी पाहिजे’, ‘बिन बियांचे झाड’ या लोकनाट्यांतून हा अभिनय बहरत गेला. एक गाव बारा भानगडी, सामना, सिंहासन, पिंजरा, अजब तुझे सरकार, शापित या चित्रपटांतून सकस भूमिका केल्या. सकाराम बाईंडर, बेबी, पुढारी पाहिजे, रण दोघांचे, सूर्यास्त, राजकारण गेलं चुलीत, प्रेमाची गोष्ट या नाटकांना उदंड प्रतिसाद लाभला. सूर्यास्त नाटकासाठी त्यांना नाट्यदर्पण अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले १३ जुलै २००९ रोजी पुणे येथे निवर्तले.
निळू फुले यांची माहिती देणारे विकिपिडियावरील पान
निळू फुले यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
अष्टपैलू अभिनेते निळू फुले (13-Jul-2017)
अभिनेते निळू फुले (13-Jul-2021)
Leave a Reply