
निशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील तिचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले.
निशिगंधाचा जन्म ११ ऑक्टोबर १९६९ रोजी झाला. निशिगंधाने १०० हून जास्त मराठी व हिंदी चित्रपटांतून काम केले आहे. शेजारी शेजारी, एकापेक्षा एक हे मराठी चित्रपट तसेच सलीम लंगडे पे मत रो, कर्मयोद्धा हे तिचे गाजलेले हिंदी चित्रपट. निशिगंधाने कुलवधू या मराठी मालिकेतही काम केले आहे.
निशिगंधा ही सुप्रसिद्ध लेखिका विजया वाड यांची कन्या. मराठी अभिनेते दीपक देऊळकर हे निशिगंधाचे पती. निशिगंधाने ५ पुस्तकेही लिहिली आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
# Wad, Nishigandha
Leave a Reply