प्रेमभावने बरोबरच स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचे प्रतिबिंब ज्यांच्या कवितेत दिसते त्या पद्मावती विष्णू गोळे या प्रसिद्ध प्रतिभावान कवयित्री होत्या.
१० जुलै १९१३ मध्ये त्यांचा पटवर्धन घराण्यात जन्म झाला. एम. ए. पर्यन्त शिक्षण झाल्यावर त्या पुण्यालाच वास्तव्यास होत्या.
‘प्रीति प्रथावर’ हा १९४७ मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ‘निहार’, ‘स्वप्नजा’, ‘आकाशवेडी’ व ‘श्रावणमेघ’ हे त्यांचे काव्यसंग्रह ही गाजले. बदलणार्या सामाजिक व सांस्कृतिक वातावरणात स्त्री मनाचा होणारा कोंडमारा, स्त्रीच्या भावभावना त्यांच्या कवितेतून उत्कटपणे व्यक्त होताना दिसतात. ‘माझ्या पाठच्या बहिणी’, ‘आईपणाची भीती’, ‘लक्ष्मणरेषा’ या त्यांच्या काही प्रसिद्ध कवितांमधून त्यांचे विचार प्रकर्षाने व्यक्त होताना दिसतात. त्यांच्या काव्यलेखनावर भा. रा. तांबे, गोविदाग्रज व रविद्रनाथ यांच्या कवितेचा प्रभाव होता. काव्य लेखनाबरोबरच ‘रायगडाजवळील एक रात्र स्वप्न’, ‘नवी जाणीव’ या नाटिका लिहिल्या. तसेच त्यांची ‘वाळवंटातील वाट’ ही कादंबरीही प्रसिद्ध आहे.
पद्मावती गोळे यांचे १२ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.
पद्मावती गोळे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार पद्मा गोळे (12-Jul-2017)
मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार पद्मा गोळे (12-Feb-2019)
Leave a Reply