पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर

बंदिशकार पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर यांचा जन्म २७ सप्टेंबर १९२७ रोजी झाला. पं. हळदणकर यांनी संगीतविषयक संशोधन आणि लेखनही केले होते. आग्रा घराण्याचे गायक आणि बंदिशकार म्हणून पंडित बबनराव हळदणकर यांची ओळख होती. मा.हळदणकरानी ५० वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय गायनाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. रस पिया हे त्यांचे टोपणनाव होते. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करत असत. हळदणकरांनी सुरुवातीला मोगूबाई कुर्डीकरांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली.

१९५९ पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले. १९६०च्या दशकापासून हळदणकरांनी आग्रा घराण्याच्या गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली.

ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य ठेवतात आणि आग्रा गायकीचा बोजदारपणा किंवा भारदस्तपणा ते ही गायकी मांडत असत.

पं. बबनराव हळदणकर यांचे १८ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*