पं. मुकुंदराज गोडबोले यांचा जन्म १६ जानेवारी १९४५ रोजी झाला.
पं.मुकुंदराज गोडबोले हे सांगली संस्थानचे राजगवई पं.दि.रा.गोडबोले यांचे चिरंजीव. मराठी रंगभूमीवरील सुविख्यात गायक नट श्री.उदयराज गोडबोले यांचे धाकटे बंधू . त्यामुळे घराण्यातूनच संगीताचा वारसा त्यांना लाभला होता.कृषि खात्यातील २५ वर्ष सेवेनंतर त्यांनी संगीत सेवेस वाहून घेतले होते.
‘संगीत अलंकार’ असलेल्या मुकुंदराज गोडबोले यांनी पुणे विद्यापीठाची ‘ डिप्लोमा इन म्युझिक’ ही पदविका प्राप्त केली होती. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक नट स्वरराज छोटा गंधर्व यांना गुरूस्थानी मानून ‘ एकलव्या’ ,प्रमाणे त्यांची गायकी आत्मसात करुन स्वत:च्या कार्यक्रमातील नाट्यगीतातून ते त्यांच्या गायकीचे दर्शन घडवत असत. नुकताच त्यांना ‘छोटा गंधर्व गुणगौरव’ पुरस्कार प्राप्त झाला होता.आकाशवाणी पुणे केंद्राचे ते उच्च श्रेणीचे कलाकार होते.
पं.मुकुंदराज गोडबोले यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. नुकताच त्यांना ‘छोटा गंधर्व गुणगौरव’ पुरस्कार प्राप्त झाला होता.
Leave a Reply