पं. शैलेश भागवत

प्रसिद्ध सनईवादक पंडित शैलेश भागवत यांचा जन्म २ जून १९५८ रोजी ठाणे येथे झाला.

अनेक वर्षांपासून सनई वादनाला आयुष्य वाहून घेतलेले प्रसिद्ध सनईवादक पंडित शैलेश भागवत यांचे शालेय शिक्षण ठाण्यातील ‘सेंट जॉन दि बाप्टिस्ट स्कूल’ मध्ये झाले. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी एस सी केले. शैलेश यांना लहानपणापासून शास्त्रीय संगीताची ओढ होती. त्यांचे आईवडील दोघंही संगीतप्रेमी असल्यानं त्यांच्या घरी थोर गायक- वादकांच्या रागसंगीताच्या रेकॉर्डस् होत्या व दोघंही नियमितपणे संगीत ऐकत.

१३- १४ वर्षांचा असताना शैलेश यांनी सनई वाजवायला शिकायचं असं ठरवून पं. औरंगाबादकरांकडे गेले. त्यांनी शैलेश यांना शिष्य म्हणून स्वीकारलं व श्री कौपिनेश्वर मंदिरात ते सनई शिकवू लागले.

एकदा त्यांचे सनई वादन ऐकून पंडित बिस्मिल्ला खान यांनी त्याला गंडा बांधला. बिस्मिल्ला खाँ साहेबांचे पुत्रवत प्रेम व आशीर्वाद त्यांना लाभला. आजवर चार दशकांहून अधिक काळ ते विविध ठिकाणी आणि कित्येक संगीत मैफिलींच्या मध्ये सनई वादन करत असतात.

शैलेश भागवत यांनी अनेक मोठ्या कलाकारांच्या बरोबर सनईच्या जुगलबंदीचे कार्यक्रम केले आहेत.तसेच परीक्षक म्हणून शैलेश भागवत यांनी अनेक स्पर्धेसाठी काम केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*