विजय घाटे यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला शिकण्यास सुरवात केली. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६४ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. १२ व्या वर्षी त्यांनी तबलामधील विशारद पदवी मिळविली होती.
वयाच्या १६ व्या वर्षी ते मुंबईत आले आणि बारा वर्षांहून अधिक काळ तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या कडे गुरुकुल पध्दतीत शिक्षण घेतले. वयाच्या १६ व्या वर्षीही ते आपल्या चमकदार एकल म्हणजेच सोलो तबला वादनाने प्रसिद्ध झाले.
विजय घाटे यांनी उस्ताद बिस्मिल्लाह खान, उस्ताद विलायत खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित बिरजू महाराज, पंडित जसराज, उस्ताद शाहिद परवेझ आणि अनेक मान्यवर कलाकारांच्या सोबत साथ केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय कलाकार प्रसिद्ध संगीत जेथ्रॉटेल सारख्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत आणि जॉर्ज ड्यूकेस, अल्जेर्यु, रवी कॉलतारिन यांच्या सारख्यांना साथ दिली आहे. तसेच विजय घाटे यांनी गिसॉन्टी, लॅरी कॉरीयेल, जॉर्ज ब्रुक्स इ. त्यांनी लुई बॅंक, शंकर महादेवन, हरिहरन, शिवमणी या सुप्रसिद्ध भारतीय संगीतकारांसोबत काम केले आहे.
विजय घाटे यांनी ‘विजय’ नावाचा आपला अल्बम प्रसिद्ध केला आहे. विजय घाटे यांना पं. जसराज पुरस्कार, सरस्वती बाई राणे पुरस्कार, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांचा २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
Leave a Reply