मराठी नाटक : “यदा कदाचित”, “मी नथुराम गोडसे बोलतोय”, “लाली लीला”, “पोपटपंची, “सारे प्रवासी घडीचे”, इ.
मालिका : “आभाळमाया”, “चारचौघी”, “एक झुंज वादळाशी”, “कुंकु” इ. नाटक व मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
ठाण्यातील शहरास “सांस्कृतिक शहर” हे नावलौकिक प्राप्त करुन देणार्या कलाकारांपैकी एक होतकरु अभिनेता पराग मधुकर बडेकर. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनेता व दिग्दर्शक म्हणून मोलाची कामगिरी त्यांनी बजावली. “मृगजळ”, “उन्मेष” यांसारख्या अनेक नाट्यस्पर्धांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत.
Leave a Reply