‘थिएटर अॅककॅडमी’ सारख्या संस्थेची नाटकं आणि काही चित्रपट-टीव्ही मालिकांत छोटया भूमिकांत दिसणारे परेश मोकाशी ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ या नाटकामुळे ख-या अर्थाने प्रकाशात आले ते लेखक- दिग्दर्शक म्हणून. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला.
परेश मोकाशी यांचे गाव रायगडमधलं चौक. पणजोबा पोस्टमास्टर होते. जन्म पुण्याचा असला तरी सगळं शिक्षण लोणावळ्याच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये झालं. परेश मोकाशी यांचे वडील पत्रकार होते. पुण्यात ‘केसरी’, ‘ब्लिट्झ’ वगैरेमध्ये ते काम करायचे.
थिएटर अॅहकॅडमीमुळे पहिल्यांदा माझी जागतिक रंगभूमी, जागतिक नाटक, जागतिक सिनेमा यांच्याशी ओळख झाली. तो एक नवा नाद लागला.
मग वेगळ्या प्रकारचं साहित्य, संगीत अशा सगळ्या गोष्टींनी संपुक्त असलेली ती संस्था होती. जब्बार पटेल नाटक बसवताहेत, मोहन आगाशे काम करताहेत, सतीश आळेकर अफलातून नाटक लिहिताहेत, समर नखाते, माधवी पुरंदरे यांच्यासारखे तज्ज्ञ आहेत, संस्थेमध्ये ‘घाशीराम कोतवाल’सारखं नाटक होतंय, ‘महानिर्वाण’सारखं होतंय, ‘बेगम बर्वे’सारखं होतंय.. हे म्हणजे अलिबाबाची गुहाच.
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाबद्दल बोलताना परेश मोकाशी सांगतात
‘समुद्र’ झाल्यावर एके दिवशी बापू वाटवेंनी लिहिलेलं दादासाहेब फाळके यांचं चरित्र माझ्या वाचनात आलं. त्यानंतर माझ्या डोक्यावर वीज कोसळावी असं झालं. मग ठरवलं की, ही अफलातून कथा आहे. ही आपल्याला कशी काय ठाऊक नव्हती? यावर अजून काहीच कसं झालेलं नाही? त्यानंतर पंधरा दिवसांत माझी स्क्रिप्ट लिहून झाली. माझी सगळ्यात वेगवान लिहून झालेली कलाकृती म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी.
मुळात फाळके मराठी होते. त्यामुळे ते मराठीत जास्त चांगल्या प्रकारे येईल, असं माझं म्हणणं होतं. या सगळ्या अटी असल्याने हा चित्रपट काढायला कुणी धजावेना. मग अखेर मी निर्णय घेतला की, आता आपणच धाडस करूया. वडील आणि काकाही मागे उभे राहिले.
साधी-सोपी तरीही वैचित्र्यपूर्ण हाताळणी ही शैली बनलेल्या परेश यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे.
Leave a Reply