पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक नेते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी झाला.
ज्वलंत आणि प्रेरणादायी प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे. प्रबोधनकारांच्या विषयी काही सांगायचे, बोलायचे, लिहायचे म्हटले तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे अग्रणी, झुंजार पत्रकार, थोर समाजसुधारक, चित्रकार, नाटककार, इतिहासकार असे उल्लेख हमखास केले जातात. ‘ठाकरे’ नावात जी जादू आहे त्यामागचे तपस्वी जादूगार फक्त प्रबोधनकार ठाकरे हेच आहेत. प्रबोधनकार हे निर्भय होते.
प्रबोधनकारांनी बाबासाहेबांना मैत्रीच्या नात्याने गळ घातली व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या मुख्य प्रवाहात आणले. बाबासाहेबांबद्दल प्रबोधनकारांना नितांत आदर होता. दलित जनतेस उद्देशून ते एकदा म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्यावरही विश्वाकस ठेवू नका.
प्रबोधनकारांचे सबंध आयुष्य म्हणजे अनेक लढायांचा खणखणाट होता. आजच्याप्रमाणे ते लिहिणारे-बोलणारे सुधारणावादी नव्हते. स्वत: करून दाखवणारे होते. प्रबोधनकार म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार.
शिवसेनेचे प्रेरणादाते तेच होते. प्रबोधनकारांनी आमरण मराठी तरुणांच्या व्यथांना, त्यांच्यावरील अन्यायांना वाचा फोडली. त्यांना कठोर परिस्थितीशी झुंजण्यास धीर दिला, हिंमत दिली आणि –
वाघिणीचे दूध प्याला
वाघ – बच्चे फांकडे
भ्रांत तुम्हा का पडे?
ही जाणीव देऊन त्यांची अस्मिता जागविली. ‘शिवसेना’ हे नावच त्यांनी दिले.
प्रबोधनकार ठाकरे यांचे २० नोव्हेंबर १९७३ रोजी निधन झाले.
Leave a Reply