ख्यातनाम साहित्यिक पद्मश्री दया पवार यांची कन्या असल्याने लिहिण्याचा वारसा त्यांना घरातून मिळाला. आई हिरा पवार प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आणि मुख्याध्यापिका. कार्यकर्त्या-लेखक घरात जन्म झाल्याने दलित चळवळीचा, दलित साहित्याचा लहानपणापासून संस्कार. या अनुषंगानेच भारतातील प्रगतीशील, जनवादी साहित्य चळवळीची सातत्याचा अनुबंध. पहिली वहिली कविता “कोकीळा”
ठाणे हेच त्यांचे निवासाचे व कामाचे, त्यातही अध्यापनाचे क्षेत्र असल्याने ठाण्यातील शैक्षणिक – सामाजिक – साहित्यक – सांस्कृतिक घडामोडींशी त्यांचा निकटचा संबंध आहे. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाशी लेखिका म्हणून सातत्याचा अनुबंध. पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच् माध्यमातून ठाण्यामध्ये पहिल्यावहिल्या लोककला महोत्सवाचे आयोजन त्यांनी केले.
त्या गेली वीसहून अधिक वर्षं ठाण्यात राहत आहेत. अनेक भलेबुरे अनुभव-आठवणी त्यांच्या स्मरणात कोरल्या गेल्या आहेत. ठाण्यातील प्रा.स.वि.कुलकर्णी, पी. सावळाराम, डॉ. दाऊद दळवी यांच्या सानिध्याने आणि मार्गदर्शनाने त्यांना तरुण वयात एक वेगळी उमेद दिली हे त्या कृतज्ञतेने मान्य करतात.
मनातील ठाणे :
या शहरातील अनेक बदलांना त्या साक्षी आहेत. गेल्या वीस वर्षांत शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्याचे पडसाद शहराच्या सांस्कृतिक – सामाजिक जीवनात उमटताना दिसत आहेत. ठाणे आज एक कॉस्मोपोलिटिन शहर म्हणून विकसित होते आहे, ही त्यांना अत्यंत स्वागतार्ह बाब वाटते. ठाणे हा आदिवासी बहुलता असलेला जिल्हा आहे. परंतु आदिवासींच्या दृष्टीने एकूणच सर्व पातळ्यांवर उणीव जाणवते. त्या अनुषंगाने पुढील काळात संस्थात्मक काम उभे करणे ही काळाची गरज आहे, असं त्या सुचवतात.
पुरस्कार : बालकवी पुरस्कार – महाराष्ट्र राज्य शासन, “वामन अनंत रेगे पुरस्कार, ठाणे”, “कवयित्री शांता शेळके पुरस्कार”, मा. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान यांचा एकूण मराठी कवितेतील योगदानासाठी दिला जाणारा पुरस्कार, “पी सावळाराम पुरस्कार”, ठाणे महानगरपालिका आणि पी. सावळाराम स्मृती प्रतिष्ठान, ठाणे. अशा अनेक सन्मानांनी गौरविण्यात आलेल्या कवयित्री प्रज्ञा दया पवार या ठाण्याच्या साहित्य वैभवच आहेत.
Leave a Reply