मराठी अभिनेता प्रसाद ओक यांचे शालेय शिक्षण भावे स्कूल, व बीएमसीसी पुणे येथे झाले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमासारखाच एक कार्यक्रम पुण्यात चारुदत्त आफळे सादर करायचे. यात चंद्रशेखर महामुनी गायक होते. त्यांच्या टीमसोबत प्रसाद ओक कोरस म्हणून गात असत.
प्रसाद ओक यांनी करिअरची सुरुवात नाटकांपासून केली होती. रणांगण, भ्रमाचा भोपळा या नाटकांमधून प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली.
सारेगमपचा विजेता बनल्यानंतर प्रसाद ओक हे झी मराठीचा ब्रँड अँबेसेडर बनले, एका वाहीनीचा चेहरा बनणारा प्रसाद हा पहिला मराठी कलाकार. त्यानंतर स्टार वाहिनीनेही प्रसाद ओक यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केले होते. आतापर्यंत ७० ते ७५ सिनेमे, ८० ते ८५ मालिका आणि २५ नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा प्रसाद ओक यांनी उमटवला आहे.
प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःचे मोठे फॅन निर्माण केले आहे. नांदी या नाटकात त्यांनी रुक्मीणीची भूमिका केली होती. नांदीचे एकूण १०० प्रयोग केले.
‘दामिनी’, ‘घरकुल’, ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाची संसार’, ‘असंभव’, ‘वादळवाट’ आणि ‘होणार ‘सून मी ह्या घरची’ या प्रसाद ओक यांच्या मालिका विशेष लोकप्रिय ठरल्या, ‘धतिंग धिंगाणा’, ‘खेळ मांडला’, ‘हाय काय नाय काय’, ‘फुल ३ धमाल’, ‘दोघात तिसरा’, ‘क्षण’, ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ हे प्रसाद ओक यांचे गाजलेले सिनेमे.
नुकतीच प्रसाद ओक यांनी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली व ती लोकांच्या खास पसंतीस पडली.
Leave a Reply