“जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असत कुणीतरी, दिवे सगळे विझल्यावर जळत असतं कुणीतरी, अशाच खिडकीत चंद्र होऊन टपटपण्यात मजा आहे, कुणीतरी ऐकत असतं हृदयातून म्हणून गाण्यात मजा आहे.”
अशा हृदयातून ऐकणार्या रसिकांसाठी ज्यांनी गेली तीन दशकं आपल्या लेखणीतून २००० हून अधिक गीतं लिहिली आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली, ती गीतं लिहिणारे ठाण्यातील ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक, सुसंवादक म्हणजे प्रवीण दवणे !
“सावर रे !”, “स्पर्शगंध”, “रंगमेध”, “गंधखुणा”, “हे शहरा” यांसारखी अनेक रसिकप्रिय काव्यसंग्रह, लेखसंग्रह दवणे यांच्या नावे प्रसिद्ध झाले आहेत.
मनातील ठाणे :
ठाण्याविषयी बोलताना प्रवीण दवणे म्हणतात की, कालचे ठाणे हिरवळीचे, नाते संबंधांचे, घरोब्याचे नाते जपणारे होते. आजचे ठाणे ट्रॅफिक जॅमचे, प्रदूषणाचे आणि माणूसपण तुटलेले वाटते, असं जर कुणाला वाटत असेल तर त्यात काही चिकीचं नाही. हा बदल अपरिहार्य आहे. ठाण्यातल्या समस्यांवर आपलं प्रशासन योग्य त्या उपाययोजना करताना दिसत आहे. सध्या ठाणे हे परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. पण असं असलं तरी ठाण्यातली सांस्कृतिक जाणीव ही कधीच कमी होणारी नाहीये आणि त्यामुळेच उद्याचं ठाणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरेल यात कोणतेही दुमत नसावे, असं दवणे सरांचं ठाण्याबद्दल मत आहे.
पुरस्कार : “सर्वोत्कृष्ट वाडम़याचा” राज्यपुरस्काराचा पुरस्कार, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, मा. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. ठाण्याचं नाव भारतातच नव्हे तर जगात मोठ करण्याचा मान दवणे यांच्याकडे जातो.
Leave a Reply