देशपांडे, प्रवीण केशव

आपल्या आयुष्यातले सुगंधी आपण जपून ठेवतो ते मनाच्या कोपर्‍यात नाहीतर कपाटाच्या कोपर्‍यातल्या अल्बममध्ये. कधी कधी ते अल्बम बघताना आपण पुन्हा जुन्या काळात रममाण होतो. असेच नॉस्टॅलजिक मूड बनवून आपलं चित्त हरखून घेणारे ठाण्यातले छायाचित्रकार म्हणजे “प्रवीण देशपांडे” हे होय.

बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरी करताना, सर जे.जे. महाविद्यालयातून छायाचित्रकलेची “पदविका” त्यांनी प्राप्त केली. गेली सुमारे २७-२८ वर्षे प्रवीण या क्षेत्रात कार्यरत आहेत. छायाचित्रकला हे साध्य नव्हे तर साधन समजून विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांशी निगडीत. १४ वर्षांपूर्वी ठाणेकर छायाचित्रकारांसाठी स्थापन झालेल्या “फोटो सर्कल” या संस्थेच्या सर्व कामांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. तसेच फोटोसर्कल सोसायटीतर्फे ठाण्यातल्या ग्रामीण भागात विनामूल्य छायाचित्रकलेच्या कार्यशाळा आयोजित करण्यातही त्यांचा वाटा असतो.

२००८ सालचा बिझनेस कम्युनिकेटर्स असोसिएशनचा छायाचित्रकलेचा रौप्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*