चीन येथे झालेल्या ज्युनिअर सर्कीट स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधीत्व करुन देणारी जागतिक क्रमवारीत भारताला ५ वे स्थान मिळवून देण्याची किमया करणारी ठाण्याची प्रिती प्रदीप मोकाशी म्हणजे ठाण्याचा गौरवच आहे. शालेय जीवनातच ५ वेळा ठाणे संघाचे प्रतिनिधीत्व करुन ३ वेळा सुवर्णपदक मिळवून प्रितीनं भविष्यातील यशाची नांदीच केली. त्यानंतर ९ वर्षं ठाण्याचे राज्य पातळीवर प्रतिनिधित्व करुन प्रत्येक वेळेला सुवर्णपदक मिळवून तिनंही ठाण्याचा मोठा गौरव केला आहे.
१९९९ साली प्रथम ठाणे संघात निवड झाल्यानंतर प्रितीनं वळून पाहिलंच नाही. दुबई येथील ज्युनिअर सर्कीट स्पर्धेत कांस्य पदक, जम्मू येथे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राची कर्णधार आणि वैयक्तिक सुवर्णपदकासह; महाराष्ट्रालाही सुवर्णपदक. तिला आजवर पदकांबरोबरच २००२ साली ठाणे गुणीजन पुरस्कार या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
<!– – टेबल टेनिस पटू
पत्ता : ४, सुयोग, रामवाडी, नौपाडा, ठाणे ४००६०२
कार्यक्षेत्र : टेबल टेनिस
दूरध्वनी : २५३३९९४६ – भ्रमणध्वनी : ९८२०७५६६६३
–>
Leave a Reply