एखाद्या व्यक्तिचं कर्तुत्व आणि त्यांची आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा ही त्याला एका अशा पदावर नेऊन ठेवते जिथे तो माणूस यशाच्या मागे लागत नाही तर यश त्याच्या मागे लागतं. पण त्यावेळी देखील यशापशाची पर्वा न करता आपल्या कामात, त्या कामाच्या धुंदीतच जगायला त्याला आवडतं. असंच ठाण्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे लेखक, प्रध्यापक श्री. प्रदीप ढवळ !
प्रदीप ढवळ हे ठाणेकरांना काही नवीन नाही. विविध क्षेत्रात, सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रमांत आपण त्यांचं नाव नेहमी ऐकतो, वाचतो हेही सांगायला नको ! गेली २० वर्षं ज्ञानसाधना महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रदीप ढवळ यांनी लेखक म्हणून आपली एक वेगळी छाप साहित्यवर्तुळात ठसवली आहे, “नरेंद्र ते विवेकानंद एक झंझावत”, “जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर एक ओअॅसीस” हे चरित्र ग्रंथ, “नरेंद्र ते विवेकानंद” एक झंझावत यावर आधारित “संन्यस्त ज्वालामुखी”सारखं विश्वविक्रमी नाटक, शिवबा हे प्रचंड यशस्वी महानाटक, आगामी चित्रपट “संताजी घोरपडे” तसंच अनेक विविधांगी लेखन ठवळ यांनी केलं आहे. कोकण कला अकादमी, को.म.सा.प., प्रेरणा सांस्कृतिक व्यासपीठ, शारदा शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील ज्येष्ठ महाविद्यालय, नालंदा भरतनाट्यम् नृत्यनिकेतन आदी संस्थांचे ढवळ सर अध्यक्ष आणि विश्वस्त आहेत.
मनातील ठाणे:
ठाणे शहराबद्दल बोलताना ते म्हणतात, तान्ह्या बाळाला ज्याप्रमाणे आईच्या मायेची आणि तीच्या कुशीतली ऊब हवी असते तसंच माझं ठाणे आहे. या ठाण्यात मायेचा ओलावा आहे, आपुलकीची ऊब आहे. आजचं, कालचं आणि उद्याचं ठाणे हे भौगोलिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या जरी बदललं तरी ठाण्याची संस्कृती, इथली माणसं आणि त्यांच्या मनात भरलेली आपुलकी ही कधीच संपणार नाही. आज मा. महापौर, प्रशासन अधिकारी आणि सहकारी यांनी ठाण्यात विकासाचा जो जोम धरला आहे, त्यानुसरुन नक्कीच उद्याचं ठाणे हे समस्त जगाचा मानबिंदू ठरेल.
पुरस्कार : त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांना “ठाणे गौरव”, “साहित्य भूषण”, “आदर्श शिक्षक”, “धनंजय कीर स्मृती पुरस्कार”, ८४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे “साहित्य भूषण” पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
एक संवेदनाशील माणुस्की जपणारा साहित्तिक मना मनांशी नाती जपणारा उ्तकृष्ठ योगी म्हणजे प्राध्यापक, लेखक प्रदीप धवल सर यांस मान:पुर्वक अभिमानाचा मुजरा!