गेली ५० वर्षे शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते. भारतीय (प्रा.अ.का.प्रियोळकर) व परदेशीय (डॉ. एह. ए. ग्लीसन) या भाषाशास्त्रज्ञांच्या हाताखाली संशोधन. पदवी-पदव्युत्तर वर्गांचा अध्यापन अनुभव. महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवसाय-शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. दादर माहीम येथील कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय यांचे संचलन करणार्या संस्थेचे संयुक्त कार्यवाह-पदधारी, तसेच तसेच दादर येथील सुप्रसिद्ध शारदाश्रम विद्यामंदिर या संस्थेचे भूतपूर्व शैक्षणिक सल्लागार, स्पॅनिश/इटालियन इ. परकीय भाषांचे अध्यापक. काही सुप्रसिद्ध सामाजिक संस्थांचे उच्च पदाधिकारी. द्वारकानाथ माधव अभ्यासिका या सेनापती बापट यांनी प्रेरणा दिलेल्या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक/संचालक.
नियतकालिके व ग्रंथ (संपादन/लेखन)
“समाजसेवा” व “दीपस्तंभ” या सांस्कृतिक व शिक्षणविषयक नियतकालिकांचे काही वर्षे संपादन. “चिंतामणी चरितम“ (भारतातील भूतपूर्व अर्थमंत्री, अर्थशास्त्रज्ञ, भाषापंडित कै.चिं.द्वा. देशमुख यांचेवरील संस्कृतमध्ये रचलेले चरित्र). पुणे विद्यापीठाच्या स्पर्धापरीक्षा विभागातिल प्राध्यापिका डॉ.सौ.विजया दिघे यांच्या सहभागासह रचलेली “आय.ए.एस. स्पर्धापरीक्षा” (मार्गदर्शन व प्रबोधन) व “थोडक्यात पण महत्वाचे” (मराठी माध्यमाच्या संस्कृत विद्यार्थ्यांसाठी पुस्तके). वृत्तपत्रे, नियतकालिकांतून अनेक वर्षे स्फुट लेखन.
Leave a Reply