(१९१०-१९७१)
पुणे येथील अर्थशास्त्र संस्थेचे दीर्घकाळ संचालक.
नियोजन, कृषी अर्थशास्त्र, किंमतविषयक धोरण यांचा विशेष अभ्यास. महाराष्ट्रतील सहकारी चळवळीत विशेष रस. सहकाराचे तत्त्व रूजावे व वाढावे म्हणून विविध पातळयांवर अखंडप्रयत्न.
राज्यातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या प्रवरानगर येथील संस्थापनेमागील मुख्य प्रेरणा प्रा. गाडगीळ यांची. रिझर्व बँकेचे सल्लागार.
काहीकाळ राज्यसभेचे सदस्य. १९६७-७१ या काळात भारतातील योजना आयोगाचे उपाध्यक्ष. कृषिविकासातील समस्या, सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण, नियोजनाची विविध प्रतिमानेयावर गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये संशोधनासाठी मार्गदर्शन केले.
काही काळ पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत नेतृत्त्व केले.
Leave a Reply