कर्तृत्व आणि परिश्रम या गुणांच्या बळावर सामान्यातील सामान्य माणूस देखील यशस्वी होऊ शकतो हे आर. आर. पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यत्वापासून सुरू झालेला पाटील यांचा प्रवास उपमुख्यमंत्री पदापर्यंत झाला आहे.
ग्रामीण भागात स्वच्छतेच्या एका कडीतून विकासाची श्रृंखला निर्माण करणारी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ही आर.आर. पाटील यांच्याच नेतृत्वाची देणगी आहे. राज्यातील गावे तंटामुक्त करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही लक्षणीय आहेत. ग्राम विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता, गृह या खात्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
`आबा ‘ या नावाने ते परिचित आहेत.
Leave a Reply