
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचे संस्थापक आहेत. ते एक नावाजलेले व्यंगचित्रकार आहेत.
महाराष्ट्राचे व मराठी भाषेचे हित याबाबतच्या त्यांच्या कडव्या धोरणांमुळे त्यांचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. राज ठाकरे यांनी इ.स. २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी लोकांच्या लोंढाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले.
राज ठाकरे यांचे खरे नाव स्वरराज. त्यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला. संगीतकार श्रीकांत ठाकरे हे त्यांचे वडील तर शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे काका.
राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाले. राज ठाकरे आपले काकांप्रमाणे व्यंग्यचित्रकार आहेत. वॉल्ट डिस्नी हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट करणे आवडले असते असे ते सांगतात.
ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या दैवताचे स्थान देतात.
आपली राजकीय कारकिर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळ्वण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्त्वाचा समजला जातो
इ.स. २००६, च्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.
## Raj Thackrey
Leave a Reply