विविध विषयांवर आधारीत चित्रपट प्रेक्षकांना बहाल करणार्या राजाभाऊ परांजपे यांचा जन्म २४ एप्रिल १९१० सालचा. शाळेत असतानाच नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजाभाऊंचा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता, तरी दिग्दर्शन हाच त्यांच्यासाठी सर्वांत यशाचा भाग ठरला. पण चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश अगदी सहजपणे झाला नव्हता. मूकपटांच्या जमान्यात पडद्यावर चित्रपट सुरू असताना साथीला बाहेरून संगीत वाजवले जाई, त्या वेळी अशा मंडळींना गंमत म्हणून साथ करणारे राजाभाऊ हळूहळू चित्रपटसृष्टीकडे वळले.
खरंतर चित्रपटसृष्टीत राजा परांजपेंचा प्रवेश झाला तो गोदावरी सिनेटोनमध्ये संगीत दिग्दर्शक बापूराव केतकर यांचे सहायक म्हणूनच. अर्थात, त्यांना केशवराव दात्ये यांच्या शिफारशीवरून “नाट्यमन्वंतर’ या नाट्यसंस्थेत त्यांना ऑर्गनवादकाची भूमिका मिळाली. राजाभाऊंची अभिनयातील समज पाहून तिथेच त्यांना “लपंडाव’ या नाटकात अचानक संधी मिळाली. या नाटकातील एक कलाकार अचानक नाटक सोडून गेला. दात्ये यांनी त्याच्या जागी राजाभाऊंना संधी दिली, त्या संधीचे त्यांनी सोने केले. पुढे केशवराव दाते यांनीच त्यांना “सावकारी पाश’ या चित्रपटातील भूमिका मिळवून दिली. “सावकारी पाश” मधील भूमिकेनंतर ते छोटी मोठी कामे करत होते; त्यानंतर भालजी पेंढारकर यांच्याकडे ते सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. भालजींच्याच काही चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला. भूमिका कोणतीही असो, मग ती विनोदी, कौटुंबिक, रहस्यप्रधान अथवा कारुण्यमयी, राजाभाऊंनी त्या भूमिकेला आपला रंग देत गेले. हेच कौशल्य त्यांनी चित्रपट दिग्दर्शित करताना ठेवले, त्यामुळे एकाच वेळी अनेक प्रकृतीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही त्यांनी त्यामध्ये विलक्षण यश मिळवले. कलाकाराकडून नेमके हवे ते काढून घेणार्या राजा परांजपे या गुणवान दिग्दर्शकाने अनेक कलाकारांना आपल्या चित्रपटांतून उत्तमपणे सादर केले. विनोदी आणि कौटुंबिक तसेच असे तीनही प्रकारचे चित्रपट राजाभाऊंनी दिग्दर्शित केले आणि यशस्वी करून दाखवले.
४० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी ८० पेक्षा जास्त मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कामे केली. या मध्ये “आधार”, “गुरुकिल्ली”, “पडछाया”, “पाठलाग”, “बायको माहेरी जाते”, “हा माझा मार्ग एकला”, “सोनियाची पाउले”, “आधी कळस मग पाया”, “सुवासिनी”, “जगाच्या पाठीवर”, “बाप बेटे”, “आंधळा मागतो एक डोळा”, “देवघर”, “गाठ पडली ठका ठका”, “पसंत आहे मुलगी”, “गंगेत घोडे न्हाहले”, “उन पाउस”, “चाचा चौधरी”, “लाखाची गोष्ट”, “पेडगावचे शहाणे”, “पारिजातक”, “सत्यभामा” “जरा जपून”, “पुढचं पाउल”, “बलिदान”, “दो कलियाँ”, “जिवाचा सखा”, “लव अॅण्ड मर्डर” या चित्रपटांचा समावेश असून यापैकी राजा परांजपेंनी काही चित्रपटात अभिनय देखील केला असून त्यांना “पडछाया”, “पाठलाग”, “हा माझा मार्ग एकला”, “सुवासिनी”, या चित्रपटांचाठी साजा परांजपेंना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आलेले होते.
अभिनय, दिग्दर्शनाचा “राजा’ राजा परांजपे (9-Feb-2017)
अभिनय, दिग्दर्शनाचा “राजा’ राजा परांजपे (25-Apr-2017)
Leave a Reply