विचारे, राजन

राजन विचारे हे ठाण्यामधील सुपरिचित राजकीय व्यक्तिमत्व. ठाणे शहर मतदारसंघातून ते २०१४ साली लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी ते ठाणे शहराचे आमदारही होते.

ठाणे शहराचे महापौरपद भुषवित असताना त्यांनी सॅटिससारखा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारून ठाणे स्टेशन परिसरामधील वाह्तुकीची कोंडी दुर केली होती. तसेच शहरासाठी ११० एम. एल. डी. पाणी पुरवठा योजना राबवून पाणी कपातीचा प्रश्न सोडविण्याचा अनोखा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे त्यांनी कापूरबावडी येथील कलादालन तसेच मानपाडा येथील नाटयगृहाची बांधणी करून त्यांनी पर्यटनाच्यादृष्टीनेदेखील ठाणे नगरीला नवा आयाम देण्याचा दमदार प्रयास केला होता.

आमदार झाल्यानंतर अधिवेशनांमध्ये ठाण्याच्या विकासाचे विवीध प्रश्न विधीमंडळामध्ये उपस्थित करून जनतेच्या समस्यांना वाचा फोडली. गावदेवी मंडईचा गेली १४ वर्षे रखडलेला प्रश्न त्यांच्या पुढाकारामुळे अधिवेशनामध्ये मांडला गेला होता.

शहरातील स्थानिक लोकांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता ठाण्यामध्येच मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी सरकारमागे तगादा लावणे, शहर्‍यातील प्रचंड कचर्‍याची विल्हेवाट लाविण्याकरिता भरावभूमी चा आग्रह धरणे, शहरातील नागरिकांना बेस्टची सुविधा मिळावी यासाठी पवारनगर ते शिवाजीनगर, वाघबीळ ते सिप्झ, दादलानी पार्क ते अंधेरी अशा गर्दींच्या ठिकाणांवर बस सेवा सुरू करून देणे, अशी कित्येक कल्याणकारी कामे त्यांनी आजवर केली आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे ठाण्यामधील विविध ठिकाणी आयोजन करून, त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रणे देवून, व उपयुक्त संवादसत्रे घेवून मराठी संस्कृतीची काहीशी भुसभुशीत झालेली मुळे, पुन्हा रूजविण्याचे कार्य ते आजही अतिव उत्साहाने करित असतात. महादहीहंडी महोत्सव, तसेच चैत्र महिन्यामध्ये सामुहिक चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करण्याचा पायंडा, ते महापौर असतानाच पाडला गेला.

ठाणे परिसरातील पर्यटन विकासाकरिता ठाणे शहरालगत पसरलेल्या खाडीमध्ये, कल्याण ठाणे व बेलापुर या प्रदीर्घ पट्टयादरम्यान जलमार्ग विकसीत करून जलवाहतुकीसाठी या खाडीचा वापर करण्याचा प्रस्ताव त्यांनी सरकारसमोर मांडला आहे. तसेच मेट्रो रेल्वेचा बहिउद्देशीय प्रकल्प ठाण्यापर्यंत वाढवण्याची मागणी सुध्दा ते रेल्वे प्राधिकरणाकडे करीत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*